March 1, 2026
IMG-20260114-WA0051

करमाळा, प्रतिनिधी – जागतिक पारायण दिनानिमित्त श्री संत गजानन भक्त परिवाराकडून माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथे सामुहिक श्री गजानन विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक पारायणात करमाळा येथील ५१ भाविकांनी सहभाग घेतला.

रविवार दि.११ रोजी सकाळी भूपाळी व काकड आरती झाल्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायांचे उपस्थितांकडून सामुहिक वाचन करण्यात आले. यात महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील सुमारे ३ हजार भाविकांनी सहभाग घेतला. करमाळा शहरासह परिसरातील ५१ भाविक महिलांनीही श्री गजानन विजय ग्रंथाचे मनोभावे पारायण केले.

या धार्मिक उपक्रमासाठी करमाळा शहरातील शारदा कोकीळ, शुभदा शिलवंत आणि स्वाती मसलेकर यांनी परिश्रम घेतले.‌ यापूर्वी पंढरपूर आणि इंदापूर येथे पार पडलेल्या पारायणात देखील करमाळा शहरातील संत गजानन महाराज भक्त परिवारातील २०१ महिला भाविकांनी सहभाग घेतला होता.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *