April 13, 2026
IMG-20260320-WA0043

करमाळा, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील वडगाव (पान) येथील इयत्ता सहावीतील चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचा करमाळ्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सराफ सुवर्णकार समितीचे तालुकाध्यक्ष मनोहर अरुण बुऱ्हाडे यांनी करमाळा पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित आरोपींवर कडक कायद्यांनुसार गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पीडित मुलीला शासनाकडून आर्थिक मदत, मोफत उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार व मानसिक समुपदेशन देण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच ॲसिड विक्रीवर कडक निर्बंध लागू करून परवाना प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करावी, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवाव्यात आणि पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

हे निवेदन देतेवेळी बोराडे यांच्यासह ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते संजय घोरपडे, किरण बोकन, नरेंद्रसिंह ठाकुर, प्रा. शिवाजीराव बंडगर, सचिन चव्हाण, सुवर्णकार अमोल बागडे आदी जण उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *