August 5, 2026
IMG-20260805-WA0033

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जेऊर येथील डॉ. प्राजक्ता मीरा आबासाहेब गोडसे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथून आंतरविद्याशाखीय (शिक्षणशास्त्र) विषयात पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी संपादन केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जेऊरसह करमाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

डॉ. गोडसे यांनी बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशन या संशोधन केंद्रातून आपले संशोधन पूर्ण केले. त्यांना डॉ. एम. व्ही. मते यांचे मार्गदर्शन लाभले. ‘पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील गुणवत्तावृद्धीसाठी समाजमाध्यमे आधारित उपक्रमांचे विकसन’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. माध्यमिक शाळांच्या गुणवत्तावृद्धीसाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर, त्याचा शैक्षणिक प्रक्रियेवरील परिणाम आणि त्यातून गुणवत्तावाढीसाठी राबविता येणाऱ्या उपक्रमांचा त्यांनी सखोल अभ्यास केला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देवडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. पी. शिखरे, डॉ. एम. एस. डिसले, संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. एम. टी. मते यांच्यासह महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, संशोधन मार्गदर्शक, शिक्षक, सहकारी, मित्रपरिवार व आप्तेष्टांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. गोडसे यांच्या संशोधन प्रवासात वडील आबासाहेब गोडसे, आई मीरा गोडसे, पती तुकाराम नवत्रे-पाटील व चि. श्रीहान यांचा मोलाचा पाठिंबा लाभला. डॉ. गोडसे सध्या पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागात यशवंतराव चव्हाण माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. डी.एड., बी.एड., एम.एड., डबल ग्रॅज्युएट, डबल पोस्ट ग्रॅज्युएट, डी.एस.एम., नेट, सेट व पीएच.डी. अशी त्यांची शैक्षणिक कारकीर्द असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे संशोधन पेपर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!