November 5, 2026
IMG-20261105-WA0043

दहिगाव उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी आवर्तन सोडण्याची मागणी

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा व माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर दहिगाव उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार नारायण (आबा) गोविंदराव पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.

दोन्ही तालुक्यांतील अनियमित पावसामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान, रब्बी हंगामासाठी पाण्याची अनिश्चितता आणि आगामी काळात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई याकडे आमदार पाटील यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने पाणी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी बैठकीत केली. यासाठी संबंधित विभागाला आवश्यक निर्देश देण्याची विनंतीही त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली.

दुष्काळी परिस्थितीत शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी दहिगाव उपसा सिंचन योजनेतून वेळेत पाणी उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!