November 6, 2026
IMG-20261106-WA0019(1)

करमाळा, प्रतिनिधी – गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेच्या वतीने गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी वसुबारसनिमित्त गोमातेचे पूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, गोसेवा समितीचे सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गोपालन संस्थेचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांनी उपस्थितांचे स्वागत करून गोपालन संस्थेच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. यावेळी माने भाऊसाहेब यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या, तर संस्थेचे जगदीशजी शिगची यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

वसुबारसनिमित्त गोमातेला बाजरीची भाकरी, राळ्याचा भात, गवारीची भाजी आणि गूळ यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी गोमातेचे विधिवत पूजन करून तिला चारा खाऊ घातला. गोसेवेचा संदेश देत पारंपरिक पद्धतीने वसुबारस सण साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाला गोसेवा समितीचे प्रकाश मुनोत, अनिल सोळंकी, चंद्रकांत कटारिया, आशिष बोरा, दिनेश मुथा, बँक इन्स्पेक्टर शंकर रासकर, अक्षय मंडलेचा, अजिंक्य गुगळे, शुभम कटारिया, आयुष कटारिया, विठ्ठल भणगे, वैभव दोशी, वर्धमान खाटेर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे, मागील वीस वर्षांपासून गोमातेची निष्ठेने सेवा करणारे पोपटराव काळदाते व त्यांचा परिवारही यावेळी उपस्थित होता. तसेच श्रावक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कटारिया व त्यांचा परिवार यांनीही गोमातेचे पूजन केले. गोपालन संस्थेचे सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवरांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर यांनी सर्व उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!