September 5, 2026
IMG-20260806-WA0036

शहराच्या इतर भागातील कामेही लवकरच सुरू होणार -नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील पाणी समस्या निवारण करण्याच्या कामाचा श्रीगणेशा झाला असून गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ४ येथील शाहू नगर भागातील नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत आणि उपनगराध्यक्ष अतुल हरिभाऊ फंड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रभाग क्रमांक ४ च्या नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाला सुरुवात करण्यात आली.

करमाळा शहरासह उपनगरांतील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन कालबाह्य झालेली आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शाहूनगर भागातही सुरळीत पाणीपुरवठा संबंधात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारचे प्रतिनिधित्व करणारे उपनगराध्यक्ष अतुल फंड आणि नगरसेविका सौ. स्वाती फंड यांनी नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांच्याकडे या भागात नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत तसेच नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन नगराध्यक्षा सौ. सावंत यांनी हे काम तातडीने हाती घेऊन या कामाची प्रत्यक्षात सुरुवातही केली आहे.

याप्रसंगी नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत, नगरसेविका सौ. सुनीता ढाणे, सौ. चैताली सुनील सावंत, सौ. जबीन मुलाणी, सौ. ज्योत्स्ना लुणिया, सौ. पूजा इंदलकर, नगरसेवक रवि जाधव, विक्रमसिंह परदेशी, संदीप कांबळे, सिद्धेश लावंड, विजय घोलप, सचिन घोलप, दीपक चव्हाण, सचिन गायकवाड, सुनील बनसोडे यांच्यासह प्रभागातील नागरिक सेवानिवृत्त शिक्षक श्री. बोधे गुरुजी, रमेश कवडे, किरण जाधव, अभयसिंह शेंडगे यांच्यासह प्रभागातील अनेक महिला उपस्थित होत्या.

यावेळी नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांनी सांगितले की, करमाळा नगर पालिका निवडणुकी वेळी प्रचारादरम्यान शहरातील सर्वच प्रभागांतील महिला भगिनींनी पाणीपुरवठ्याच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. यावेळी या समस्या निवारण करण्याचे त्यांनी वचन दिले होते. याच वचनपूर्तीची सुरुवात प्रभाग क्रमांक चार मधील शाहूनगर भागातून करण्यात आली असून शहराच्या उर्वरित भागातही लवकरच नवीन पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. सावंत यांनी दिली आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!