October 27, 2026
IMG-20261026-WA0051

करमाळा, प्रतिनिधी – दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जेऊर येथे शुक्रवारी आयोजित दुष्काळ निवारण व पाणीटंचाई आढावा बैठक करमाळा येथे घेण्यात यावी, अशी विनंती पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजिनाथ विघ्ने यांनी केली आहे.

यावेळी सविस्तर बोलताना ॲड. विघ्ने यांनी सांगितले की, तालुक्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ आगामी काळात महत्वपूर्ण पाऊले उचलण्यासाठी प्रशासनाला सक्षम करणे गरजेचे आहे. या दृष्टीने आमदार नारायणआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जेऊर येथील बाजार तळ आवारात असलेल्या स्व.गोविंदबापू पाटील सभागृहात पाणीटंचाई व दुष्काळ निवारणार्थ आढावा बैठक आयोजित केली आहे. आमदारांनी बैठक कुठे घ्यावी हा त्यांच्या अधिकारातील विषय असला तरी अधिकारी, पदाधिकारी व सामान्य जनतेच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण आढावा बैठक आमदार साहेबांनी जेऊर येथे न घेता पंचायत समिती सभागृह करमाळा येथे घ्यावी, अशी विनंती ॲड. विघ्ने यांनी केली आहे.

करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड . विघ्ने यांच्या विनंतीनंतर शुक्रवारी जेऊर येथे होणारी आढावा बैठक आमदार महोदय करमाळ्यात घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!