करमाळ्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – आर्थिक व्यवहाराच्या भांडणात महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली आहे. मारहाणी दरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादी कडून करण्यात आला असून याबाबत करमाळा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील पश्चिम भागातील एका छोट्या गावात ही घटना घडली आहे.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१८/०३/२६ ते दि. २०/०३/२६ दरम्यान शेजारील गावातील ओळखीच्या दोघांसह तीन अनोळखी लोकांनी फिर्यादीच्या घरी येऊन आर्थिक व्यवहारावरून फिर्यादी व तिची अल्पवयीन मुलगी यांना हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या दरम्यान यातील एका आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे. पो.स.इ. ज्ञानेश्वर दळवी हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

