September 19, 2026
IMG-20260917-WA0024

काळ्याफिती लावून कामकाज; मागणी मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारा

करमाळा, प्रतिनिधी : उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वेतनश्रेणीप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी करमाळा येथील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १६ सप्टेंबर) काळ्याफिती लावून कामकाज केले. शासनाच्या विलंबाच्या धोरणाचा निषेध यावेळी करण्यात आला.

राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव जानेवारी २०२५ पासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. महासंघाने दिलेल्या संपाच्या नोटीसीनुसार आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले. या आंदोलनात राज्यातील सुमारे ३५ हजार ५०० न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान मागणीची दखल न घेतल्यास १६ व १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा काळ्याफिती लावून कामकाज, तसेच ५ नोव्हेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन आणि त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा सोलापूर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव जाधव व तालुका प्रतिनिधी महेश पोतदार यांनी यावेळी दिला आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!