April 13, 2026
IMG-20260324-WA0092

आणखी दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून झाला होता वाद

करमाळा, प्रतिनिधी – अधिक दारू पिण्यास पैसे न दिल्याने झालेल्या पती-पत्नीच्या झटापटीत पतीचा उंचावरून पडून मृत्यू झाला आहे. पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयताच्या पत्नीवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस हवालदार जोतीराम विठ्ठल बाळसराफ यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २३/०३/२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कृष्णा ड्रायव्हींग स्कुल नावाच्या दुकानासमोरील गाळ्याच्या बेसमेंटमध्ये पडून युवराज भानुदास पवार (वय-५५ वर्षे रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याचा मृत्यू झाल्याप्रकरणी करमाळा पोलिसात अकस्मात म्हणून नोंद झाली होती. या घटनेचा अधिक तपास केल्यानंतर दि. २३/०३/२६ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मयत युवराज भानुदास पवार व त्याची पत्नी मंगल युवराज पवार (वय-५० वर्षे, दोघे रा. बाभुळगाव खालसा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे करमाळा बस स्टॅन्डजवळील संगम चौकाजवळ असलेल्या दुकानासमोर दारु पिऊन बसले होते. मंगल हिला आणखी दारु प्यायची असल्याने तिने मयत युवराजला पैसे मागीतले. यावेळी युवराजने पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढत जाऊन झालेल्या झटापटीमध्ये मंगल हिने युवराजला ढकलल्याने तो कृष्णा ड्रायव्हींग स्कुल नावाच्या दुकानासमोरील गाळ्याच्या बेसमेंटमधील शहाबादी फरशीवर पडल्याने त्यांच्या डोक्यास लागुन जखमी होवुन मयत झाला.

पती युवराज याच्या मरणास कारणीभूत झाल्याने करमाळा पोलिसांनी मंगल युवराज पवार हिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनी गुन्हा दाखल केला आहे. सहा.पो.नि. गिरीजा मस्के या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *