April 11, 2026
IMG-20260407-WA0040

करमाळा, प्रतिनिधी – बारामती येथील इंग्लिश मीडियम स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन (EMSSA) च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘स्पोर्ट्स डायमंड अवॉर्ड २०२६’ साठी करमाळा शहरातील रोहित परदेशी यांची निवड करण्यात आली आहे.

या संदर्भात परदेशी यांना संस्थेकडून दि.६ रोजी अधिकृत निवडपत्र देण्यात आले आहे. रोहित परदेशी हे शहरातील नवभारत इंग्लिश स्कूल येथे स्पोर्ट्स कोच म्हणून काम पाहतात. त्यांनी क्रिकेट सह क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी, नेतृत्वगुण आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यामुळे युवकांना प्रेरणा मिळत असल्याचे संस्थेने पत्रात नमूद केले आहे.

दि.१६ एप्रिल २०१६ रोजी हा पुरस्कार सोहळा बारामती येथील कृष्णा सागर हॉटेल (भिगवण रोड) येथे सकाळी ११ ते दुपारी ०२ या वेळेत पार पडणार आहे. रोहित परदेशी यांच्या या यशाबद्दल नवभारत इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. सुुनिता देवी, मुख्याध्यापिका सौ. अश्विनी क्षीरसागर यांच्यासह करमाळा शहरातील शिव क्रांती, गजानन, गौतमा स्पोर्ट्स क्लब आणि जेऊर येथील गजराज स्पोर्ट्स क्लब यांसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *