April 11, 2026
IMG-20260409-WA0023

स्नेहगंगाश्री आळंदीकर यांच्या सुश्राव्य वाणीची शिवभक्तांना पर्वणी

करमाळा, प्रतिनिधी – करमाळ्यातील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.१५ ते मंगळवार दि.२१ दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी दिली आहे. सुप्रसिद्ध कथा वाचक स्नेहगंगाश्री (माई) शृंगारे (आळंदीकर) यांच्या सुमधुर वाणीत यावर्षीचा कथा यज्ञ पार पडणार आहे.

भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या वतीने करमाळा शहरात गेल्या सत्तावीस वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १९९९ साली भगवानजी शर्मा यांच्या भागवत कथेपासून ओतूरकर महाराज, पंडित प्रदीप कुमार मिश्रा, रामराव ढोक महाराज, अनुराधा दीदी आदी सुप्रसिद्ध महानुभावांच्या वाणीद्वारे रामायण, भागवत आणि शिव महापुराण करमाळा व परिसरातील भाविक भक्तीरसात चिंब झालेले पहावयास मिळालेले आहे. अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर हा धार्मिक उपक्रम पुढे नेत शहर व तालुक्यातील भाविकांना शिव महापुराण कथेचा लाभ मिळावा, या उद्देशाने करमाळा शहरातील एसटी कॉलनी नजीकच्या संत गजानन महाराज मंदिरा समोरील प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने सोमवार दि. ५ रोजी करमाळा शहरातील संत गजानन महाराज मंदिर येथे बैठक पार पडली. या बैठकीस श्रेणिकशेठ खाटेर, विठ्ठलराव भणगे, कुरुलकर मॅडम, नगरसेवक दीपक चव्हाण, रवींद्र विद्वत, चरणसिंग परदेशी, नारायण पवार, विजय देशपांडे, बबलू कुलकर्णी, गिरीश शहा, दादासाहेब तनपुरे, प्रितम वीर, शंकर रासकर, राम टांगडे, सचिन सोरटे, माजी नगरसेविका सौ. संगीताताई खाटेर, हनुमान परदेशी, संदीप चुंग, आशिष बोरा, दिनेश मुथ्था, वैभव दोशी, कालिंदी धोकटे, कालीदास घोगरे, आडकर सर, विनोद कानडे, दिलीप शिरगिरे, मुळे सर, सुरेश आटोळे, देवकर काका यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. करमाळा शहर व तालुक्यातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमास सहभाग नोंदवविण्याचे आवाहन भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *