May 6, 2026
IMG-20260416-WA0038

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष हेमंत शिंदे यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत संविधानामुळे सर्वांना समान हक्क व न्याय मिळाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या विचारांनुसार शेतकरी, महिला व वंचित घटकांच्या विकासावर भर देणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी भीमजयंती ही विचारांची जयंती म्हणून साजरी करण्याची भीमप्रतिज्ञा घेतली. यावेळी नितीन खटके, निलेश पाटील, अतुल निर्मळ, अजित उपाध्ये, सागर साखरे, आदिनाथ माने, किशोर कदम, उमेश मोहिते, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!