करमाळा तालुक्यातील घटना
करमाळा, प्रतिनिधी – लगतच्या तालुक्यात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी सुट्टी निमित्त करमाळा तालुक्यातील नातेवाईकांकडे आली असता तिला अज्ञाताने फूस लावून पळवले आहे. दि.१९/०४/२६ रोजी हा प्रकार निदर्शनास आला आहे.

याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकाने करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संबंधित मुलगी शिक्षणासाठी बाहेरगावी होती. सुट्ट्यां निमित्त ती करमाळा तालुक्यातील नातेवाईकांकडे आली होती. दि.१८ एप्रिल रोजी फिर्यादी तिला घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांकडे आले होते. मात्र दि.१९ रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी इतर कामानिमित्त बाहेर गेले असताना साडेनऊच्या सुमारास नातेवाईकाने सदर मुलगी घरात नसून कुठेतरी निघून गेल्याचे फिर्यादीला फोनवरून सांगितले. दरम्यान, मुलीने फोन करून “मी एका मुलासोबत जात आहे” असे सांगितल्याचे फिर्यादी यांनी नमूद केले आहे.

या फिर्यादी नंतर करमाळा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून करमाळा पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

