करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि.च्या वतीने शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या विविध सुविधांच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आज शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी १०.०० वाजता करमाळा – कुर्डुवाडी रोडवरील बेंद फाटा येथील ॲग्रो मॉल येथे पार पडणार आहे.

या प्रकल्पांतर्गत ॲग्रो मॉल, अवजारे बँक, पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, ६० टन वजनकाटा तसेच BRC युनिटच्या उद्घाटनासह शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक शुकाचार्य मोरे यांच्या हस्ते या सेवांचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, कुर्डूवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, करमाळ्याचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, पंचायत समिती सदस्य भरत अवताडे, सोलापूरचे डी डी एम नितीन शेळके, एलडीएम राम वाखरे, SBIचे बँक मॅनेजर सुनील बिडगर, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (धाराशिव)चे प्रकल्प व्यवस्थापक कांतीलाल गीते, भूमच्या जलप्रिय शेतकरी उत्पादक कंपनीच्या सौ. लता तिकटे, परंडा येथील श्री योगिराना शेतकरी उत्पादक कंपनीचे, डॉ. अमोल गोफणे व सर्व संचालक, धाराशिव येथील आपली ऍग्रो शेतकरी उत्पादक कंपनीचे दिनेश पाटील व सर्व संचालक, BOI बँक मॅनेजर शीतल मटकर, बी टी एम करमाळाचे अजय कुमार बागल, बार्शी येथील श्री भगवंत महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सौ. अर्चना आवटे व सर्व संचालक आणि धाराशिवची वॉटर टीम आणि कृषी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम स्थळी शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असून परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

