March 1, 2026
IMG-20251110-WA0040

करमाळा, प्रतिनिधी – गेल्या दहा वर्षांपासून नगरपालिका निवडणुकीत शहरातील रजपूत समाजाच्या लोकप्रतिनिधीत्वा साठी प्रयत्नशील असलेले अमोल परदेशी हे आपल्या समर्थकांसह मोठे शक्ती प्रदर्शन करत करमाळा शहर विकास आघाडीच्या सावंत गटात सोमवारी दाखल झाले.

करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये रजपूत समाजाचे प्राबल्य आहे. समाजाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी समाजाचा लोकप्रतिनिधी असावा, अशी मागणी असल्याने अमोल परदेशी हे मागील अनेक वर्षांपासून जगताप गटात सक्रिय होते. त्यामुळे २०२५ च्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत जगताप गटातून अमोल परदेशी यांना संधी देण्याचा विश्वास जगताप गटाकडून अपेक्षित होता. मात्र ऐनवेळी जगताप गटाकडून डावलले गेल्याने समाजासह प्रभागातील अनेकांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे समर्थकांनी अमोल परदेशी यांना वेगळा मार्ग अवलंबण्याचा आग्रह धरला आणि याच आग्रहास्तव अमोल परदेशी यांनी सावंत गल्ली येथे रजपूत समाजासह प्रभागातील कुरेशी, लष्कर, फंड, मारडकर आदी मंडळींसह करमाळा शहर विकास आघाडीच्या प्रवर्तक सावंत गटात सोमवारी सायंकाळी प्रवेश केला.

यावेळी सावंत गटाचे जेष्ठ मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, हमाल पंचायतचे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत, पै. सुनील बापु सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख प्रवीण कटारिया, प्रभाग क्र.१ चे उमेदवार रवी जाधव, माजी नगरसेवक रविंद्र कांबळे, मा. नगरसेवक अजिज तांबोळी, हुमरान मुलाणी, शंकर हवालदार, संग्राम देशमुख यांच्यासह सुतार गल्ली, फंड गल्ली, दत्त पेठ, कानाड गल्ली, कसाब गल्लीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *