May 6, 2026
IMG-20260503-WA0044

भव्य शामियाना उभारणीला सुरुवात

करमाळा प्रतिनिधी – सामाजिक ऐक्य, मानवता आणि सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली आहे. रविवार दि. १० मे रोजी हा भव्य सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि.२ रोजी करमाळा बायपास चौकातील चांदगुडे प्लॉट येथे विधिवत पूजा करून मैदान स्वच्छता व मंडप उभारणीच्या कामास उत्साहात सुरुवात करण्यात आली.

यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी सांगितले की, हा विवाह सोहळा केवळ लग्न समारंभ नसून गरजू कुटुंबांना आधार देणारा, त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा आणि समाजात एकोप्याचा संदेश देणारा उपक्रम आहे. प्रत्येक वधू-वराने आनंदाने संसाराची सुरुवात करावी ही श्रीराम प्रतिष्ठानची भावना आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सेवाभावी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम दरवर्षी अधिक भव्य होत आहे. श्रीराम प्रतिष्ठानचा प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःच्या घरचा समारंभ समजून या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहे.

यंदा हा विवाह सोहळा चौथ्या वर्षात पदार्पण करत असून अधिक नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळत असून तालुक्यात सर्वत्र या सामुदायिक विवाह सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

यावेळी महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, विजय घोलप, उद्योजक राजेंद्र शियाळ, भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे, विलास जाधव, भीष्माचार्य चांदणे, बाळासाहेब गोरे गुरुजी, अमोल पवार, नितीन झिंजाडे, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, बंडू शिंदे, दादा देवकर, जयंत काळे पाटील, नितीन निकम, सचिन भणगे, प्रमोद फंड, बाबा घोडके, स्वानंद वांगडे, हर्षद गाडे, संजय दुर्गुळे, राजेश पाटील, वसिम सय्यद, अशोक मोरे, संदीप काळे, गणेश गोसावी, विनोदी इंदलकर, भरत गुंड, संदीप रेगुडे, महेश दिवाण, प्रसाद कोकीळ, शैलेश राजमाने तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!