करमाळा, प्रतिनिधी – शहरातील जामखेड रस्त्यावरील यादव वस्ती येथील रहिवासी शांताबाई (भाभी) शरद यादव (वय-७८) यांचे आज दि. 12/05/26 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.
त्यांच्यावर जामखेड रस्त्यावरील शिवार हॉटेलच्या पाठीमागील यादव वस्ती येथे आज सायंकाळी 08 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पाठीमागे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मकाई कारखान्याचे संचालक अमोल (आबा) यादव यांच्या त्या मातोश्री होत. भाभींच्या निधनानंतर भाजपा महिला आघाडी राज्य उपाध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या रश्मी (दीदी) बागल यांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.
