June 21, 2026
IMG-20260520-WA0029

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मुस्लिम बालकांच्या खतना कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दि.१९ मे रोजी पार पडलेल्या या शिबिरात खतना स्पेशालिस्ट डॉ. उजेर बेग यांनी एकूण १०२ बालकांची खतना (मुंज) शस्त्रक्रिया केली.

शहरातील अहिल्यानगर रस्त्यावरील नालबंद मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी ७ वाजता मौलाना सय्यद अली मुजावर यांच्या प्रार्थनेनंतर शिबीराची सुरवात करण्यात आली. यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार, जहांगीर बेग, न्यु इरा इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष अजीम मोगल, कै.ना.म. जगताप शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख, बकसभई शेख, जमीर शेख, मोहसीन नालबंद यांच्यासह शहरातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

या शिबिरास माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, अमीर तांबोळी, जेष्ठ पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशपाक सय्यद, रा.काॅं.चे आझाद शेख आदींनी भेट दिली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अरबाज बेग, असीम बेग, समीर शेख, शाहरुख शेख, शाहीद बेग, जावेद शेख, अकील सय्यद, आलीम खान, सोहेल शेख आदींनी परिश्रम घेतले. शेवटी फारुक जमादार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

इस्लाम धर्मात खतना प्रथेला विशेष महत्त्व आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी बालकांना सोलापूरला जावे लागते. शिबीराद्वारे ही शस्त्रक्रिया करमाळ्यातच एकत्रितपणे राबविल्यास खर्चाची बचत होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम विकास परिषद दरवर्षी शिबिर आयोजित करत आहे. त्यामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांतील लहान बालकांना या उपक्रमाचा लाभ मिळत आहे.
-मौलाना मुजावर, करमाळा.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!