June 19, 2026
IMG-20260619-WA0013(1)

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील सुतार गल्ली येथील रहिवासी श्रीमती मंगलबाई चंदुलाल परदेशी (वय-७४) यांचे आज शुक्रवार दि.१९/०६/२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

आज शुक्रवार दि.१९ सायंकाळी ६ वाजता करमाळा शहरातील सुतार गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून विकास नगर येथील दत्त मंदिर पाठीमागील बारा बंगले परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कै. मंगलबाई यांच्या मागे ३ मुले, १ विवाहीत मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्री कमलादेवी मंदिर देवस्थान ट्रस्टचे दिवंगत विश्वस्त कै. रतनसिंह सुंदरसिंह परदेशी यांच्या त्या थोरल्या सुनबाई तर मे. क्वालिटी सॉ मिलचे श्री. झनकसिंह रतनसिंह परदेशी यांच्या त्या भावजय आणि ईश्वरसिंग किसनसिंग परदेशी यांच्या त्या भगिनी होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!