June 19, 2026
IMG-20260615-WA0044(1)

करमाळा, प्रतिनिधी – अल्पवयीन मुलांसमोर गुन्हेगारी कृत्य करून तसेच अल्पवयीन मुलाला व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आदेशावरून करमाळा पोलीस ठाण्यातील बाल कल्याण अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत बाल कल्याण अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनी म्हटले आहे की, २०२२ सालापासून करमाळा तालुक्यातील कंदर येथील स्वप्नील बाबुराव देवडकर हा अनुक्रमे ९ व ७ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलांना व्यसनाच्या संपर्कात आणुन त्यांना सिगारेट ओढण्यास भाग पाडून तसेच त्यांच्यासमोर गुन्हेगारी कृत्ये करुन त्या बालकांच्या मानसिक, शारीरिक व नैतिक विकासावर विपरीत परिणाम करीत आहे.

या फिर्यादीवरून पूर्वीच्या भारतीय न्यायसंहितेसह अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमांन्वये दाखल गुन्ह्यात अटकेत असलेल्या स्वप्नील बाबुराव देवडकर याच्यावर बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे या गुन्हयाचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!