June 19, 2026
IMG-20260616-WA0033

करमाळा, प्रतिनिधी : श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार येथे १५ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली.

नवीन गणवेश, दप्तर आणि पुस्तकांसह विद्यार्थी आनंदाने शाळेत दाखल झाले. पहिल्याच दिवशी प्रार्थना, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसेच शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता नर्सरी ते नववीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन, तर द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत मेहनत, शिस्त व संस्कारांचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी नियमित उपस्थिती, स्वच्छता व अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मेघाली शेटे यांनी केले. या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!