करमाळा (प्रतिनिधी) :
करमाळा शहरात येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गोपाल वाघमारे यांनी नागरिकांना जनजागृतीचा संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, “मतदान हा आपल्या शहराच्या विकासाचा पाया आहे. म्हणून नागरिकांनी तात्पुरत्या लोभाला — म्हणजेच पैसे, दारू, जेवण किंवा क्षणिक फायद्याला — बळी पडू नये. प्रामाणिक, जबाबदार आणि जनतेसाठी नेहमी उपलब्ध असणारा उमेदवारच निवडावा.”

वाघमारे यांनी पुढे सांगितले की, आज अनेक ठिकाणी निवडणुकीत मतांची खरेदी-विक्री सुरू असून त्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाच्या कामांना अडथळा येतो. अशा परिस्थितीत सजग मतदारांनी जागरूकतेने मतदान करून स्वच्छ आणि जबाबदार प्रशासन निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

ते म्हणाले, “आपल्या शहराचा विकास नेत्याच्या पैशात नाही, तर त्याच्या निष्ठा, दृष्टिकोन आणि प्रामाणिक कामात असतो. नागरिकांनी एकदा विचारपूर्वक मतदान केलं, तर पुढील पाच वर्षे शहराचं भविष्य उज्वल होईल.”

शेवटी त्यांनी आवाहन केले की, “करमाळ्याचा विकास हा सर्वांच्या सहभागातूनच शक्य आहे. म्हणून मत विकू नका — मताचा उपयोग शहराच्या भल्यासाठी करा.”

.

.

.

.
.
