July 28, 2026
IMG-20260716-WA0047(1)

तीन दिवस चालणार वाटप

करमाळा, प्रतिनिधी – देवशयनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठान यांच्या वतीने तीन दिवस चहा व बिस्किट वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने विदर्भ, मराठवाडा, खानदेशातून अनेक दिंड्या-पालख्या करमाळा मार्गे पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. पंढरपूर गाठताना या दिंड्या पालख्यांचे करमाळ्यापासून मोजकेच टप्पे उरलेले असतात. बहुतेक दिंड्या पालख्यांची शहरासह लगतच्या ग्रामीण भागात अनेकांकडे भोजनाची व्यवस्था होत असली तरी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे सकाळी लवकर निघणाऱ्या भाविकांना चहा पाण्याची सोय होणे दुरापास्त असते.

ही बाब लक्षात घेऊन कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने उद्या शुक्रवार दि. १७ जुलै ते रविवार दि.१९ जुलै २०२६ या कालावधीत वारकऱ्यांना चहा बिस्किटे पुरवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आहे. उद्यापासून म्हणजे शुक्रवारपासून रविवार पर्यंत सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून भाविकांना मोफत चहा व बिस्किटांचे वाटप करण्यात येणार आहे.

करमाळा शहरातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या सर्व भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!