करमाळा, प्रतिनिधी – श्री भैरवनाथ तरुण मंडळ, वाशिंबे आणि श्रीमती गोपाबाई दमाणी ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिंबे येथे शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थ व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १२४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी वाशिंबे गावचे सरपंच तानाजीबापू झोळ, डॉ. संजय साळुंखे, माजी सरपंच प्रताप झोळ, अमृत निमकर, अंकुशदादा झोळ, हर्षवर्धन पाटील, त्रिंबकदादा झोळ, अमोल भोंग, गणेश झोळ, सौरभ झोळ, मंगेश झोळ, प्रताप पाटील, तुषार पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे आहे. श्री भैरवनाथ तरुण मंडळाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून मोठ्या संख्येने रक्त संकलित झाले. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

.

.

.

