September 22, 2026
IMG-20260923-WA0000

करमाळा तालुक्याचे राजकारण… किती आले आणि किती गेले…. जगरहाटीच्या या चाकोरीत चालले, तोपर्यंत टिकले… चाकोरीबाहेर गेले ते संपले…!!!

सध्याच्या बुलेट ट्रेनच्या जमान्यात तालुक्याच्या राजकारणाची जीर्ण बैलगाडी कुरकुरत चालत असताना अचानक अवतरली एक लक्झरी एंट्री… ‘काळ्या’चं पांढरं करणारी…!!!

यांचं सगळंच लक्झरी… काय तो थ्री पीस… काय ते सिमेंटचे बाकडे… काय तो पाण्याचा टँकर… काय त्या देवदर्शनाच्या वाऱ्या… काय तो जेसीबीतून आपलीच फुले आपल्याच पगारी गड्यांकडून उधळण्याचा आणि आपणच ‘सुपारी’ दिलेल्या घोड्यावरून मिरवणूक काढण्याचा फार्स आणि काय ती प्रसिद्धी करण्यासाठी बोलावलेली पी आर टीम….!!!

माध्यमांना भेटवस्तूंची आणि खाद्यपदार्थांची प्रलोभने… नवीन असलेल्यांना याची भुरळ पडली तरी तालुक्यातील सर्व प्रवृत्त्या कोळून पिलेल्यांनी हा क्षणभंगुर बडेजाव लांबूनच पाहिला… तोपर्यंत प्रत्येक भेटीगणीक हिरवी पत्ती मिळणारी गॅंग यांची पाईक झालेली…

जो पाईक झाला तो आपला आणि जो आपल्या अस्तित्वाला जुमानत नाही त्याला तसल्या बिगर फ्रेमच्या चष्म्यातून पाहण्याची आणि केलेलं बोलून दाखवण्याची यांची वृत्ती…!!! प्रत्यक्षात कोणी मागितले नसताना स्वतःहून देण्याचा यांचा अट्टाहास आणि ते सारखं बोलून दाखवण्याची खूमखुमी…!!!

अहो मॅडम, कष्टाचं वाटलं तर त्याची कधीतरी परतफेड होऊ शकते… पाया पडायला येणाऱ्याच्या खिशातील नोटा काढून घेणाऱ्याच्या नोटा तुम्ही उधळणे तुमच्या पथ्थ्यावर थोडीच पडणार होतं???

तुम्हाला खरंच तालुक्याचा कळवळा असता तर शेजारच्या तालुक्याऐवजी तुम्ही आपल्याच तालुक्यात मुहूर्तमेढ रोवली असती…!!! तालुक्यातला आहे म्हणून कधी कोणाला एक रुपयाचीही सूट न दिलेल्यांना अचानक आलेला ‘माये’चा पाझर न ओळखण्या इतके मेषपात्र लोक तालुक्यात नक्कीच नाहीत….!!!

हा बडेजाव शेवटी क्षणभंगुर ठरला असला तरी “पुढच्याच ठेच, मागचा शहाणा” या उक्तीप्रमाणे प्रमाणे नुसत्या प्रसिद्धीचा हव्यास असलेल्या इतरांनीही हा ‘आदर्श’ डोळ्यासमोर ठेवून लोकांच्या गरजेचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करण्याची वृत्ती सोडून देणे गरजेचे आहे, कारण….

ऊपर वाले की लाठी में आवाज़ नहीं होती…!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!