November 5, 2026
IMG-20261103-WA0030

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील वशिंबे येथील नवनाथ झोळ यांना उद्योगपती सौरभ उर्फ राणा सुर्यवंशी याने जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सौरभ उर्फ राणा सूर्यवंशी याच्याविरोधात करमाळा पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील नवनाथ मधुकर झोळ (वय ५३) यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सौरभ उर्फ राणा सूर्यवंशी (रा. अमनोरा सिटी, हडपसर, पुणे) याच्याविरुद्ध करमाळा पोलीसात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२) व ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सहा.पो.नि.बालाजी वळसणे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!