March 1, 2026
IMG-20251201-WA0016

करमाळा, प्रतिनिधी – नगरपालिका निवडणूक प्रचाराची सांगता आज होणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील दहा प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार केला असला तरी राहुल जगताप यांचा प्रभागातील जनतेशी असलेल्या नेहमीच्या संपर्कासह सोशल मीडिया, होम टू होम मतदारांच्या भेटीगाठी, त्यातून झालेला संवाद यामुळे राहुल जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.

दिवंगत माजी आमदार नामदेवराव जगताप यांचा राजकीय वारसा लाभलेले राहुल जगताप हे २००६ ते २०११ या कालावधीत या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत. प्रभागातच निवासस्थान असल्यामुळे संपूर्ण जगताप कुटुंबाचा प्रभागातील जनतेशी पूर्वीपासूनच संपर्क दांडगा राहिलेला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कामे करून घेण्याच्या निमित्ताने तसेच पदावर नसतानाही समस्यांचे निराकरण करण्यासाठी राहुल जगताप यांच्याकडे सामान्य जनतेची नेहमी वर्दळ दिसून येते.

अशातच 2025 च्या निवडणुकीत भाजपाकडून प्रभाग पाचच्या उमेदवारीसाठी राहुल जगताप यांचेच नाव पुढे आल्यामुळे प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी प्रभागात नागरिकांच्या भेटीगाठींना सुरुवात केली होती. यानंतर सोशल मीडियासह प्रभागातून पदयात्रा काढत जवळपास तीन वेळा होम टू होम प्रचार फेऱ्या काढल्या आहेत. या माध्यमातून त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला असून व्यक्ती न व्यक्तीशी संपर्क साधला आहे. यावेळी त्यांना भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, गणेश चिवटे, कन्हैयालाल देवी, अतुल फंड, महादेव फंड, जेष्ठ बंधू चिंतामणी जगताप यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनिता देवी आदींची साथ लाभली आहे.

राहुल जगताप यांची भाजपातून असलेली उमेदवारी आणि प्रचारात घेतलेली आघाडी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आणि स्थानिक स्तरावरील बागल, घुमरे, चिवटे, देवी आदी भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निधी मिळण्यास सुलभता असल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रभागातील लोकप्रतिनिधी म्हणून योग्यतेची मोहोर जनमानसातून उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *