करमाळा, प्रतिनिधी – शहरातील मौलाली नगर येथे मतदाना दरम्यान प्रभागात फिरण्यावरून तसेच प्रचार करण्या वरून झालेल्या वादावादीचे पर्यावसान मारामारीत झाले. मंगळवार दि. ०२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

याबाबत जमीर कासम सय्यद मुजावर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार चैताली सुनील सावंत यांचा मतदान प्रतिनिधी म्हणून काम करत होते. यावेळी ते रोडवर थांबले असताना उस्मान हाशमोद्दीन तांबोळी यांनी जमीर यांना चापट मारली व अर्षद उस्मान तांबोळी आणि अमीर अल्ताफ तांबोळी यांनी जमीर यांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे.

तसेच याबाबत उस्मान हाशमोद्दीन तांबोळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जमीर सय्यद व इतर दोन अनोळखींनी उस्मान तांबोळी यांना ‘तू धनुष्यबाणाचा प्रचार का करतो’ असे म्हणून तांबोळी यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली आहे.

वरील दोन्ही तक्रारीवरून करमाळा पोलिसांनी उस्मान तांबोळी, अर्शद तांबोळी, अमीर तांबोळी आणि जमीर सय्यद यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून सहा.पो.नि. शिनगारे आणि सहा.पो.नि. वाडगे हे करत आहेत.

.

.

.

