March 1, 2026
IMG-20260108-WA0049

करमाळा , प्रतिनिधी – सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नुकतीच गठित करण्यात आली. या समितीत करमाळा शहरातील सौ.माधुरी राजेंद्र परदेशी व तालुक्यातील खांबेवाडी येथील ॲड. शशिकांत नरुटे यांची वर्णी लागली आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत जिल्ह्यातील एकूण १९ जणांची अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ. माधुरी परदेशी आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी करमाळा तालुकाध्यक्ष ॲड. शशिकांत नरुटे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा ग्राहक पंचायतीच्या वतीने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

या निवडीनंतर सौ. परदेशी आणि ॲड. नरुटे यांनी ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रशासकीय व्यासपीठ मिळाले असल्याचे तसेच ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

या निवडी बद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, प्रांत सहसचिव दीपक इरकल व सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे करमाळा तालुका पदाधिकारी आणि सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *