March 1, 2026
IMG-20260118-WA0018(1)

करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील वरकटणे येथे सामायिक जागेच्या वादातून एका महिलेला तिच्या पुतण्याने शिवीगाळ व मारहाण केली आहे. गुरुवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत वरकटणे येथील श्रीमती शोभा बाळासाहेब माने यांनी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरकटणे शिवारातील शेती गट नं. १६५/४/ब मधील त्यांच्या राहत्या घरी संक्रांती निमित्त त्यांची सून व नातवंडे घरी आली होती. त्यावेळी त्यांचा पुतण्या पृथ्वीराज उर्फ सोन्या राजेंद्र माने याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने घरालगतच्या सामायिक जागेत काम सुरू केले. तेव्हा शोभा यांनी सदर जागेची चतु:सीमा निश्चित नसल्याने काम थांबवण्याची त्याला विनंती केली. मात्र पृथ्वीराज याने त्यांना शिवीगाळ करत ठिबक पाईपच्या तुकड्याने हात, डोके व पाठीवर मारहाण केली. तसेच घरासमोर वाहने उभी केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देत “तुझ्या कुटुंबावर खोट्या केसेस दाखल करून अडकवीन”, अशी भीती निर्माण करणारी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

श्रीमती शोभा बाळासाहेब माने (वय ५८, रा. वरकटणे) यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीसांनी पृथ्वीराज उर्फ सोन्या राजेंद्र माने याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 118 (1), 351 (2) व 352 अन्वये गुन्हा दाखल केला आला असून स.पो.नि. रोहित शिंदे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *