March 1, 2026
IMG-20260203-WA0047

करमाळा, प्रतिनिधी – विकासापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील सर्व गावांना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देऊन तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ वीट येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.

या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते विलासराव घुमरे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, युवा नेते दिग्विजय बागल यांच्यासह महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला वीट जिल्हा परिषद गटातील हजारो ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला.

तालुक्यातील जि.प.पं.स. निवडणूक प्रचारात राज्य पातळीवर नेते म्हणून पालकमंत्री गोरे यांची हीच पहिली मोठी सभा ठरली. या सभेमुळे वीट जिल्हा परिषद गटासह तालुक्यात गणेश चिवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *