उंदरगाव येथील एकावर गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – शेळ्या चारत असलेल्या नातवाला केलेल्या मारहाणी बाबत विचारणा करणाऱ्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी करमाळा पोलीसांत एका विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यातील रिटेवाडी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत तालुक्यातील रिटेवाडी येथील ४८ वर्षीय पिडीतेने दि.०४/०२/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.०३/०२/२६ रोजी सायंकाळी ०५.३० वाजण्याच्या सुमारास तिचा १४ वर्षीय नातू बांधावर शेळ्या चारत होता. यावेळी एक शेळी शेजारील तानाजी प्रभाकर कोकरे (रा.उंदरगाव, ता.करमाळा) याच्या शेतात गेली. या कारणावरुन तानाजीने नातवाला हाताने मारहाण करुन ढकलून दिले. त्यामुळे नातवाच्या उजव्या हाताच्या पोटरीवर व डाव्या हाताचे दंडावर खरचटले. या मारहाणी बाबत सदर महिलेने “काय झाले” असे विचारले असता तानाजीने तिलाही जातीवाचक बोलुन शिवीगाळ व दमदाटी केली.

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी तानाजी प्रभाकर कोकरे (रा. उंदरगाव, ता. करमाळा) याच्या विरुध्द अनुसूचित जाती आणि अनुसूचित (जमाती अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

