March 1, 2026
IMG-20260223-WA0048(1)

फी भरल्यानंतर पाल्याची परीक्षा घेण्याची पालकाची गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

करमाळा, प्रतिनिधी – नामवंत म्हणून घेणाऱ्या परंतु पालकांच्या असंख्य तक्रारी असलेल्या एका खाजगी शाळेने काही विद्यार्थ्यांची शाळेची फी बाकी असल्याने त्यांना परीक्षेला बसून दिल्याचा प्रकार करमाळ्यात घडला आहे. याबाबत एका पालकांनी थेट करमाळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दिला असून फी भरल्यानंतर त्याच्या पाल्याची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी विनंती केली आहे.

याबाबत सदर पालकांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, त्यांचा मुलगा शहरातील लीड स्कूल या शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत आहे‌. सध्या त्याची परीक्षा सुरू असून त्याच्या शाळेची फी थकीत असल्याने त्याचे दोन पेपर घेण्यात आले नाहीत. फी भरल्याशिवाय उर्वरित पेपर घेण्यात येणार नसल्याचे देखील शाळा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

सदरील पालकाचा मुलगा मागील चार वर्षांपासून या शाळेत शिक्षण घेत असून यापूर्वीची सर्व फी पूर्ण भरलेली आहे. सध्या केवळ २५% फी भरणे बाकी असल्याने शाळा व्यवस्थापनातील रवी झिंझाडे व निलेश राखूंडे तसेच वर्गशिक्षक यांना १५ तारखेला फी भरणार असल्याचे या पालकांनी सांगितलेले आहे. तरीही पाल्याचे पेपर घेऊ नयेत, असे वर्गशिक्षकांना शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

फी भरण्यासाठी पालकाला १५ तारखेपर्यंत वेळ आवश्यक आहे. तोपर्यंत त्याच्या पाल्याचे पेपर घेतले जाणार नसतील, तर इतर सर्व विद्यार्थ्यांचे पेपर संपेपर्यंत त्याच्या पाल्याला घरी राहण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून पाल्याला शाळेत कोणतीही अपमानास्पद वागणूक सहन करावी लागू नये. तसेच फी थकबाकीमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेणे हा प्रकार शिक्षण विभागाच्या कोणत्या नियमांनुसार आहे याची लेखी माहिती द्यावी, असेही या अर्जात म्हटलेले आहे.

फी भरल्यानंतर तक्रारदार पालकाच्या पाल्याचे राहिलेले सर्व पेपर घेण्यात यावेत. सदर प्रकारामुळे पाल्याचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या शैक्षणिक वर्षानंतर तक्रारकर्ता त्याच्या पाल्याचा प्रवेश काढून घेण्याच्या विचारात आहे, तोपर्यंत पाल्याला शाळेत योग्य वागणूक मिळावी व अंतिम परीक्षा संपल्यानंतर दाखला देण्यास विलंब करू नये, अशी विनंती या तक्रारकर्त्या पालकाने गटशिक्षणाधिकार्‍यांकडे केली आहे.

पंधरा तारखेपर्यंत फी भरणार असल्याबाबत लीड स्कुलघ्या मुख्याध्यापकांना पत्र दिले असले तरी देखील आज दि.२३/०२/२०२६ चा पेपर मुलाला देण्यात आलेला नाही व त्यावर सदर शाळेकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा देण्यात आलेला नाही. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय मिळवुन दयावा.
-तक्रारदार पालक, करमाळा.

सदर तक्रारी अर्जाच्या प्रती शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा शिक्षणाधिकारी सोलापूर, तहसिलदार करमाळा, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष तसेच करमाळा तालुका पत्रकार संघाला पाठविण्यात आल्याचे तक्रारकर्त्याने म्हटले आहे. या प्रकाराबाबत लीड स्कूलच्या मुख्याध्यापकांशी मोबाईल द्वारे संपर्क साधला असता त्यांनी “शाळेत येऊन बोला” असे उत्तर दिले आहे.

मुलांना परीक्षेस बसू देणार नाही असे कोणती ही कल्पना सदर शाळेने पालकांना दिलेली नसल्याचे कळते.सदर शाळेत झालेला प्रकार किती योग्य आहे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.या संदर्भात कोणता GR नसता ना शाळा प्रशासन असे कसे करु शकते. आणि या सर्व घटनेत मुलाच्या मानसिकतेचा विचार करणे गरजे चे आहे. आत्ता च्या fast हायपर होणाऱ्या पिढीत हे खूप धोकादायक आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *