March 1, 2026
IMG-20251203-WA0005

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपरिषदेच्या निवडणूक मतदानादरम्यान सुरळीत चाललेल्या मतदान प्रक्रियेत मतदान यंत्रावर संशय निर्माण करून मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याबद्दल करमाळ्यातील एका उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधी वर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शशीकांत कृष्णा गोमे यांनी दि. ०२/१२/२५ रोजी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते करमाळा नगरपरीषद प्राथमीक मुलांची शाळा क्र. ४ येथील प्रभाग क्र.३ च्या बुध क्र. १ येथे मतदान केंद्राध्यक्ष म्हणुन कर्तव्यावर होते. मतदान प्रक्रिया सुरळीत चालु असताना दुपारी ४ वा. चे सुमारास पोलिंग एजंट बबन चांदगुडे (रा. करमाळा) याने कोणीही मतदान केले असता त्याचे मत दुस-याच उमेदवाराला जात आहे, असे बोलुन कोणीही मतदान करायचे नाही असे सर्वांना सांगुन गैरवर्तन करुन अंदाजे अर्धा तास मतदान प्रक्रियेमध्ये फिर्यादी व इतर व्यक्तींना अडथळा निर्माण करुन मतदान होवु दिले नाही.

केंद्राध्यक्ष गोमे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी चांदगुडे याच्यावर लोक प्रतिनिधीत्व अधिनियम कलम १३१, १३२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पो.हे.कॉ. बाळसराफ हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *