वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील सावडी येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या वेदांती बाबरे यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च टाळून सावडी येथील श्री दिगंबरराव बागल माध्यमिक विद्यालयाला बेंच देऊ केले आहेत.

पुरेशा निधीअभावी ग्रामीण भागातील शाळांमध्ये बहुतेक वेळा सोयीसुविधांची कमतरता दिसून येत असते. अशा वेळी दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना आदींकडून यासाठी मदत होणे अपेक्षित असते. मात्र अलीकडील काळात अशी दातृत्वाची भावना कमी प्रमाणात दिसून येते. शासकीय सेवेत असणाऱ्या बाबरे यांनी मात्र सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आपल्या ३० नोव्हेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाला ५,६०० रुपये किंमतीचे बेंच भेट दिले आहेत.

या आदर्श उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने बाबरे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र जाधव, सचिव दत्तात्रय जाधव व शिक्षक वृंदाने तलाठी वेदांती बाबरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

.

.

