भाजपा आणि राष्ट्रवादी यांना तीन-तीन जागा
करमाळा, विशाल परदेशी – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी करमाळ्यात महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. सोमवारी सोलापूर येथे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला आहे.

या निर्णयानुसार मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या वाट्याला जिल्हा परिषदेचे कोर्टी, चिकलठाण आणि वांगी हे तीन गट आणि पंचायत समितीचे चिकलठाण, उमरड, केतुर, हिसरे, साडे आणि जेऊर हे गण आलेले आहेत. या नवीन घडामोडीमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांबाबत भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत घोषणा झाली असून या जागांसाठी या गट आणि पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुकांचा संभ्रम दूर झाला आहे.

भाजपा आणि राष्ट्रवादीच्या युतीनंतर सोमवारी दुपारपर्यंत विद्यमान आमदार नारायण आबा पाटील गट, माजी आमदार जयवंतराव जगताप गट आणि करमाळा तालुक्यातील सावंत गट यांच्या पक्षीय किंवा गटनिहाय भूमिकांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

.

.

.

.

.

