करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगर पालिकेची निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुनिता कन्हैयालाल देवी यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी (अपा) पक्षाचे पदाधिकारी, गिरीधरदास देवी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, नवभारत इंग्लिश स्कूलचा शिक्षक वृंद आणि पालक आदींनी सौ. देवी यांचा निकराने प्रचार केला. मात्र या निवडणुकीत सौ. देवी यांना हार पत्करावी लागली. ही हार जिव्हारी लागून न घेता सौ. देवी यांनी आपली दैनंदिन कामे पूर्वीच्याच उत्साहाने पूर्ववत सुरू केली आहेत.
सौ. देवी यांची ही प्रगल्भता त्यांच्या कन्या सौ. नंदिनी विरेंद्र शहा यांनी कवितेतून मांडत आपल्या आईची उत्तेजना वाढवली आहे. अत्यंत आकलनीय असलेली ही कविता आम्ही तेज वार्ता च्या माध्यमातून वाचकांसाठी सादर करत आहोत.
आई….तू कधीच हरत नाहीस…!!!
आई…
लोक म्हणाले, तू हरलीस…
निवडणुकीत नाव तुझ मागे राहिलं…,
पण,
मला माहित आहे…
तू कधीच हरत नाहीस…,
आई…
शाळेच्या पायऱ्यांवर उभी राहून…
तू अनेक स्वप्नांना दिशा दिलीस…
आणि,
घरी येऊन माझ्या प्रत्येक स्वप्नावर मायेचं छत्र धरलंस…
आई….
घर, काम, जबाबदाऱ्या सगळं तू हसत पेललंस… थकवा डोळ्यात दिसला,
पण कधीच कमकुवत् झाली नाहीस….,
आई…
तुझं धैर्यच माझं बळ आहे…
तुझी मेहनतच माझी प्रेरणा…
मतांनी नाही आई,
तु माझ्या अभिमानाने जिंकलीस…
आई…
माझ्यासाठी तू फक्त आईच नाही…
तू एक मजबूत स्त्री आहेस…
जिच्या सावलीत मुलगी स्वतःला सुरक्षित समजते…
-तुझी मुलगी गुड्डी…
(सौ. नंदिनी विरेंद्र शहा)
