करमाळा, प्रतिनिधी – करमाळा येथील पुरातन श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने गेल्यावर्षी पासून सुरू असलेल्या मंदीराच्या जिर्णोद्धार कार्याला करमाळा येथील श्रीमती कालिंदी औदुंबर जाधव यांनी रु.५१,००० ची देणगी दिली आहे.

मंगळवार दि. ११.११.२०२५ रोजी निवृत्त पोलीस उपायुक्त अभय शंकरराव येवले आणि श्रीमती छाया अरुण सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कालिंदी औदुंबर जाधव यांनी रु. ५१,०००/- चा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द केला. यावेळी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून सौ. कल्पना दादासाहेब पुजारी, रामदास सोरटे, भारत सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी जाधव यांचा सत्कार केला.

श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगतीपथावर असून भाविकांनी या कामासाठी सढळ हाताने देणगी देण्याचे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे. [ऑनलाईन देणगी साठी इच्छुकांनी व्यवस्थापक अशोक गाठे (मो. नं. ९४०४७०८९२४ / ९५७९९६१७७४) यांच्याशी संपर्क साधावा.]

.

.

.

.

.
.
