करमाळा, प्रतिनिधी – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी करमाळा मतदारसंघाच्या माजी आमदार श्रीमती शामलताई दिगंबरराव बागल आणि भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या रश्मी दीदी बागल यांचे महिला प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल करण्यात आले. सोलापूर येथे भाजपा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडे हे अर्ज सुपूर्द करण्यात आले.

डीसीसी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस होता. डीसीसी बँकेच्या कारभारावर लक्ष ठेवून असलेल्या जुन्या जाणत्या मंडळींकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सावधगिरीची भूमिका घेत तसेच अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत लक्षात घेत करमाळ्याच्या बागल परिवाराकडून महिला राखीव या जागेसाठी श्रीमती शामलताई बागल आणि रश्मी बागल यांचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला. यानुसार करमाळ्यातून शुक्रवारी सकाळी भाजपा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत बागल समर्थकांनी मोठ्या संख्येने सोलापूर गाठत दुपारी साडेअकराच्या दरम्यान हे अर्ज दाखल केले.

यावेळी वांगी सोसायटीचे चेअरमन डॉ. विजय रोकडे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र हाके, भिवरवाडी सोसायटीचे चेअरमन भारत साळुंखे, गुलमरवाडी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण खोमणे, हुलगेवाडी सोसायटीचे चेअरमन हनुमंत हुलगे, हिवरवाडी सोसायटीचे अनिल पवार, भाजपा करमाळा मंडलाध्यक्ष सचिन पिसाळ, आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, मकाईचे संचालक सतीश नीळ, रावगावचे सरपंच संदीप शेळके, पंचायत समिती सदस्य महावीर कांबळे, रावगाव ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पवार,

करमाळ्याचे उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक सचिन गायकवाड, नगरसेवक विजय घोलप, नगरसेवक महादेव फंड, नगरसेवक सचिन घोलप, नगरसेवक सुनील बनसोडे, नगरसेवक दीपक चव्हाण, शेखर जोगळेकर, विकास रोकडे, अनिल वायकर, प्रवीण यादव, सचिन ढेरे, नवनाथ बागल, दिलीप ढेरे, सचिन ढेरे, मधुकर गाडे, रवींद्र ढेरे, नाना झाकणे, नितीन तकिक, अमोल ढाकणे, अजित झांजुर्णे, नंदकुमार भोसले, युवराज रोकडे, रणजीत शिंदे, गणेश झोळ, रंगनाथ शिंदे, विष्णूपंत माने, अरुण सरडे, दिनकर सरडे, अशोक हनपुडे यांच्यासह अनेक बागल समर्थक उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट नानासाहेब शिंदे यांनी अर्ज भरण्याची कायदेविषयक प्रक्रिया पार पाडली.

.

