March 1, 2026
IMG-20251116-WA0085

करमाळा, प्रतिनिधी – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या नगराध्यक्षपदासाठी सौ. जयश्री विलासराव घुमरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी अर्ज दाखल केला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठीचे व्हिजन घेऊन सौ. जयश्री विलासराव घुमरे यांनी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

यावेळी करमाळा तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती शामलताई बागल, महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल-कोलते, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. यादृष्टीने नगराध्यक्ष पदासाठी सौ. घुमरे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत असून करमाळा नगरपालिकेच्या दहा प्रभागातून वीस उमेदवार भाजपाच्या वतीने देण्यात आलेले आहेत. करमाळा नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपाच्या वतीने पूर्ण तयारी झाली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.

यावेळी माजी नगरसेवक अतुल फंड, विजय लावंड, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, रामभाऊ ढाणे, माजी नगरसेवक सचिन घोलप, मकाईचे संचालक अमोल यादव यांच्यासह अनेक भाजपा समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

.

.

.

.

.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *