करमाळा, प्रतिनिधी – कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य आधार असतो. हे कार्यकर्ते घडवण्याचे काम लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले. विचारधारा एका दिवसात जन्म घेत नसते त्यासाठी अविरत संघर्ष करावा लागतो, ते काम मुंडे साहेबांनी केले. त्यामुळे आज सत्तेचा शिखर दिसत असल्याचे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे यांनी मौलाली नगर येथील माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती दिनानिमित्त व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. श्रीराम परदेशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना श्री. भणगे म्हणाले की, राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासले आहे. त्याची प्रेरणा मुंडे, महाजन, जोशी, अडवाणी, वाजपेयी यांच्याकडून घेतली आहे. जोपर्यंत पक्षाचा कार्यकर्ता कणखर आहे, तोपर्यंत पक्षाची विचारधारा कोणीही मोडीत काढू शकत
नाही.

यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर आदींनी आपले विचार व्यक्त केले. सोशल मीडिया तालुका संयोजक नितीन कांबळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरण बोकन, ज्येष्ठ नेते अविनाश कांबळे, पत्रकार अशपाक सय्यद, विशाल परदेशी आदी जण उपस्थित होते.

.

.

