करमाळा, प्रतिनिधी – राजकीय अनास्थेपोटी गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या गुळसडी-भंडारे वस्ती रस्त्याची गरज लक्षात घेऊन भाजपा जिल्हा सरचिटणीस व जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या रस्त्यासाठी २० लाखांच्या निधीला मंजुरी मिळवली होती. शनिवारी गणेश चिवटे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तालुक्यातील गुळसडी येथील भंडारे वस्तीला मुख्य रस्त्याशी जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग गेली अनेक वर्षे रखडलेला होता. पावसाळ्यात या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पायी जाणेही कठीण होते. शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिलावर्ग तसेच आजारी व्यक्तींना रस्त्यावरील दुरवस्थेमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांनी अनेकदा मागणी करूनही हा प्रश्न सुटत नव्हता. भंडारे वस्ती रस्त्यावरील अडचणींचा अंदाज घेत चिवटे यांनी काही दिवसांपूर्वी स्वतः स्थळ पाहणी करून ग्रामस्थांना जिल्हा नियोजन समितीमार्फत हा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळवला आणि शनिवारी प्रत्यक्ष भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली आहे. मी गेल्या भेटीत हा रस्ता अतिशय बिकट अवस्थेत पाहिला होता. ग्रामस्थांचा त्रास लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्याकडे मागणी केली. त्यांनी तातडीने या रस्त्यासाठी २० लाख रुपये मंजूर केले. या निधीमुळे रस्त्याचे काम आता जलद गतीने होणार असून काही दिवसांत हा रस्ता पूर्णपणे तयार होईल. -गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस, भाजपा.
या रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत गणेश चिवटे यांचे आभार मानले आहेत. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अफसरतात्या जाधव, रामभाऊ ढाणे, भाजपा तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, उपाध्यक्ष बंडू शिंदे, अमोल पवार, सोमनाथ घाडगे, सचिन गायकवाड, नाना अनारसे, बंडू शिंदे, महेश दिवाण, संजय दुरगळे, अशोक मोरे, वसीम सय्यद यांच्यासह गुरसळी येथील चेअरमन महावीर कळसे, आदम शेख, सरपंच प्रमोद भंडारे, उपसरपंच योगेश भंडारे, राजेंद्र भंडारे, शिवाजी पाटील, दिगंबर भंडारे , सतीश बागल, तानाजी भंडारे, प्रताप पाटील, दत्तात्रय भंडारे, हरिभाऊ भंडारे, महादेव भंडारे, रामभाऊ माने, राहुल जाधव, रणजीत भंडारे, शिवाजी बागल, संजय कुलकर्णी, गणेश महाडीक, भरत गुंड, किरण शिंदे, विनोद इंदलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.