March 1, 2026
जगदीश आगरवाल

प्रभागातून उमेदवारीचे मतदारांकडून स्वागत…!!!

करमाळा, प्रतिनिधी – मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या जनतेची नाराजगी लक्षात घेऊन आणि केवळ भाजपाकडून विकास कामांना निधी मिळण्याची आशा असल्याने करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी सांगितले आहे.

‘शत प्रतिशत भाजपा’ हा नारा घेऊन भाजपाने करमाळा नगर परिषदेची निवडणूक नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व जागांसाठी उमेदवार देऊन करमाळा नगर परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहे. यावेळी विविध प्रभागांतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असताना आगरवाल यांनी कोणताही हट्ट न धरता उमेदवारीसाठी संयम बाळगला. मात्र आतापर्यंतच्या निरपेक्ष पक्षकार्याची दखल घेत पक्षाने त्यांना प्रभाग क्र. ६ मधून उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला जबाबदारी समजून आगरवाल यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे.

हॉटेलच्या पारंपारिक व्यवसायातून वेळ काढून समाजकार्य करण्याचा आगरवाल कुटुंबाचा वारसा आहे. जगदीश यांचे आजोबा कै. लक्ष्मीनारायण आगरवाल यांनी करमाळ्यात जनसंघाची स्थापना केली होती. यानंतर त्यांचे वडील ललितशेठ आगरवाल यांनीही धार्मिक, सामाजिक कार्यासोबतच करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक पद भूषवत आपली कारकीर्द गाजवली आहे. कुटुंबाचा हा वारसा नव्या पिढीचे जेष्ठ सदस्य म्हणून जगदीश हे लहान बंधू श्रीकांत आणि ॲड. प्रियाल यांच्या साथीने पुढे चालविला आहे.

भाजपाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलेल्या जगदीश यांनी केशव प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णवाहिका, पाणी टंचाईच्या काळात पाण्याचा टँकर पुरवणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी समाजकार्य करत आज भाजपा शहराध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. पारंपारिक व्यवसायासह शेती आणि इतर माध्यमातून त्यांनी अनेक होतकरू तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय कोरोना काळातही गरजूंसह कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहापाणी, जेवणाची व्यवस्था यांसह रुग्णांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी जगदीश यांनी केलेले प्रयत्न कायम स्मरणात राहणारे आहेत.

सत्कार्यात येणाऱ्या अडचणींना तोंड देत शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जगदीश यांना आवड आहे. हे काम करत असतानाच लोक शहराचा विस्कळीत पाणीपुरवठा, अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था यांसारख्या सार्वजनिक समस्याही जगदीश यांच्यासमोर मांडतात. मागील अनेक वर्षांचा विचार करता या समस्या ‘जैसे थे’च असल्याचे जगदीश यांच्या लक्षात येते. मात्र या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी एकल प्रयत्नापेक्षा सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे असून भाजपाने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी सर्व जागा लढवण्याचा निर्धार केल्यानंतर जगदीश यांनीही यावेळी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

जनतेने मत रुपी आशीर्वाद दिला तर स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा, शहराची स्वच्छता, टिकाऊ रस्ते यांसह आगामी काळात युवा वर्गासाठी रोजगार निर्मिती, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ, महिलांसाठी गृहोद्योग, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, वैद्यकीय सुविधा तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण आदी कामांसाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही जगदीश आगरवाल यांनी दिली आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *