March 1, 2026
IMG-20251127-WA0033

करमाळा, विशाल परदेशी – नगर पालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची करमाळ्यात विशेष मांदियाळी दिसून येत आहे. अशातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे करमाळा दौरे पाहता करमाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीवर त्यांचे विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवार दि.२१ रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींच्या निमित्ताने भाजपाचे विभागीय निवडणूक प्रमुख तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, निरीक्षक तथा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि प्रचारक शशिकांत कल्याणी हे आले असताना ना. गोरे यांची अनपेक्षित उपस्थिती दिसून आली होती. यानंतर आज गुरुवार दि. २७ रोजी ना. गोरे यांनी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या निवासस्थानी निवडणुकीच्या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

यानंतर उद्या शुक्रवार दि.२८ रोजी शहरातील सुभाष चौकात सायंकाळी सात वाजता होणाऱ्या जाहीर सभेत ना. गोरे यांची विशेष उपस्थिती राहणार असून त्यांच्यासोबत वरिष्ठ स्तरावरील आणखी काही नेतेही येण्याची शक्यता आहे. आरोप-प्रत्यारोप किंवा टिकास्त्रांनी राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच परखड आणि स्पष्ट विचार मांडणारे पालकमंत्री गोरे उद्याच्या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *