March 1, 2026
IMG-20260115-WA0068

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये सोमवार दि.१२ रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी व मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेच्या शिक्षिका नयना देशमुख यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी सुनीता देवी यांच्यासह मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर शिक्षिका स्वाती काळे आणि सविता बागल यांनी आई जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या महान कार्याची महती विद्यार्थ्यांपुढे विशद केली.

आई जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शाळेत आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *