करमाळा, प्रतिनिधी – नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला चारचाकीने ठोकरल्याने दुचाकीवरील प्रौढाचा मृत्यू झाला आहे तर त्याच्यासोबत असलेली महीला जखमी झाली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

या अपघातात कंदर येथील केळी व्यापारी गणेश अर्जुन कदम (वय-६०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघातातील चारचाकी ही उमरड येथील असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर जखमी झालेल्या गणेश यांच्या पत्नी प्रभावती गणेश कदम यांना टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर गणेश यांचा मृतदेह माजी सैनिक रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.

करमाळा पोलिसांत या अपघाताची खबर देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे सांगण्यात आले आहे.

.

.

