March 1, 2026
IMG-20251213-WA0003

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील गुजर गल्ली/ दत्तपेठ येथील रहिवासी तसेच सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी हाजी मोहम्मद महेबूब खान पठाण उर्फ खान चाचा (वय-९५) यांचे राहत्या घरी वार्धक्याने निधन झाले. ते खान चाचा या नावाने प्रसिद्ध होते.

त्यांची अंत्ययात्रा आज (शनिवार) दुपारी एक वाजता त्यांच्या दत्तपेठ येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक खान सर तसेच नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी जब्बार खान यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *