करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील कोर्टी गावानजीक असलेल्या खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पात असलेली लाखोंची तांब्याची वायर चोरट्यांनी लंपास केली आहे. बुधवार दि.२४ रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पुरुषोत्तम कुसुम प्रा. लिमीटेड कंपनीचे सुपरवायझर हमीद मकबुल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सदर सोलर कंपनीच्या आवारात ठेवलेली रु. ४,१२,००० किंमतीची कॉपर केबल दि. २३/१२/२५ रोजी सायंकाळी ५ ते दि. २४/१२/२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे.

शेख यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.) अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार ए. ए. लोहार हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

