करमाळा, विशाल परदेशी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे करमाळा तालुकाप्रमुख पै. सुधाकर (काका) लावंड यांनी गुरुवारी करमाळा शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. लावंड यांच्या पाठिंब्यामुळे करमाळा शहर विकास आघाडीचे पारडे आणखी जड झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील जय महाराष्ट्र चौक येथील शिवसेना कार्यालयात पाठिंब्याचा हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी पार पडला. यावेळी करमाळा शहर विकास आघाडीचे विठ्ठलआप्पा सावंत, माजी नगरसेवक संजय सावंत, सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्यासह करमाळा शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुनील सावंत यांनी लावंड यांच्या भुमिकेचे स्वागत करुन आगामी काळात कोणताही राजकीय निर्णय लावंड यांच्या सहमतीनेच घेणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी लावंड यांच्यासह समर्थकांचा करमाळा शहर विकास आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला. मागील जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत पक्षाचा एबी फॉर्म असतानाही केवळ सावंत यांच्या उमेदवारीमुळे माघार घेतल्याचे तसेच करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा शहराची सुधारणा करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे उत्कृष्ट काम करणार असल्याची ग्वाही पै. सुधाकर (काका) लावंड यांनी यावेळी दिली आहे.

.

.

.

.
